महाराष्ट्र

खुशखबर! लाडक्या बहिणींना मिळणार दिवाळी बोनस

राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेला सोलापूरसह अन्य भागात जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा दीड हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे. आता दिवाळीच्या मुहूर्तावर राज्य सरकारने या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खास गिफ्ट देण्याची घोषणा केली आहे. दिवाळीला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना तीन हजार रुपयांचा बोनस मिळणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय काही निवडक महिलांना अतिरिक्त अडीच हजार रुपये दिले जाणार आहेत.

महायुती सरकारने ऑक्टोबर महिन्यामध्ये पात्र मुलींना आणि महिलांना अतिरिक्त बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. ऑक्टोबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यात दिवाळी असून त्याआधी सरकारकडून सर्व लाभार्थी तरूणी आणि महिलांना तीन हजार रूपयांचा बोनस मिळणार आहे. ही रक्कम महिन्याला मिळणाऱ्या दीड हजार रूपयांपेक्षा वेगळी दिली जाणार आहे. त्यासोबतच काही महिलांना अडीच हजार रूपये अतिरिक्त दिले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या अतिरिक्त बोनसचा फायदा घेण्यासाठी महिलेचे नाव हे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीत असणे गरजेचे आहे. या योजनेच्या माध्यमातून कमीत कमी तीन महिन्यांचा लाभ घेतलेला असला पाहिजे. त्याचप्रमाणे महिलांचे आधार कार्ड आणि बँक खाते एकमेकांना लिंक असणे गरजेचे आहे.

Related Articles

Back to top button