राजकीय

ब्रेकिंग! विधानसभा निवडणुकीची घोषणा उद्या होण्याची शक्यता?

राज्यात विधानसभा निवडणुका कधी जाहीर होणार आणि आचारसंहिता कधीपासून लागेल, याबाबत सध्या चर्चा सुरु आहेत. कारण आधीच लांबलेली विधानसभा निवडणूक कधी लागतेय याकडे सर्वाच्या नजरा लागून राहिल्या आहेत. मात्र, आचारसंहिता कधीपासून लागू होईल यासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. दरम्यान निवडणूक आयोग उद्या पत्रकार परिषद घेऊन राज्याच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्याची शक्यता आहे. मंत्रालयात हालचालींना वेग आला असून, सुट्टीच्या दिवशीही मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत.

काल रविवारी सुट्टी असतानाही सामाजिक न्याय विभागाचे सात शासन निर्णय जारी करण्यात आले आहे. आज पुन्हा सकाळीच साडेनऊ वाजता मंत्रिमंडळाची बैठक झाली आहे. महायुती सरकारची ही शेवटची मंत्रिमंडळाची बैठक होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

Related Articles

Back to top button