मी जीवन एन्जॉय केले म्हणत…

राज्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संभाजीनगर येथे पोलिस उपायुक्त शीलवंत नांदेडकर यांच्या एकुलत्या एक मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्याने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही. मात्र, त्याने आदल्या दिवशी वडिलांशी संवाद साधला. मात्र, दुसऱ्या दिवशी त्याने गळफास घेतला. त्याने त्याच्या खोलीतील आरशात, मी जीवनाचा आनंद घेतला आहे, मी माघार घेत नसून मला नवी सुरुवात करायची आहे, लव्ह यू बोथ असे लिहून ठेवले आहे. या प्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साहिल शीलवंत नांदेडकर (वय १७) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. साहिल बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत होता. शनिवारी नांदेडकर कुटुंबीयांनी एकत्र दसरा साजरा केला.
यावेळी साहिलही या उत्सवात हिरीहीरीने सहभागी झाला होता. तो आनंदी होता. त्याने रात्री उशिरापर्यंत आई-वडिलांसोबत गप्पा देखील मारल्या. त्यानंतर सर्वजण झोपल्यावर त्याने गळफास घेऊन खोलीतच जीवन संपवले. या घटनेमुळे नांदेडकर कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.



