क्राईम

बिग ब्रेकिंग! अजितदादा गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर तिघांकडून गोळीबार

राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकी यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

तीन व्यक्तींकडून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. त्यांच्या मुलगा आणि आमदार झिशान सिद्दीकी यांच्या ऑफिस बाहेर त्यांच्यावर गोळीबार झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दिकी ऑफिसमधून बाहेर निघाले होते. गाडी बसत असताना बाईकवरुन आलेल्या हल्लेखोरांना त्यांच्यावर गोळीबार केला. दोन ते तीन राऊंड त्यांच्यावर फायर झाल्याचे समजते. जखमी झालेल्या बाबा सिद्दिकी यांना लिलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button