ब्रेकिंग! आनंद दिघे असते तर शिंदेला गोळ्या घातल्या असत्या
शिवाजी पार्कवरील दसऱ्या मेळाव्यात संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी महायुती सरकार आणि त्यांच्या कारभारावर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी बदलापूर येथे चिमुरड्या मुलींवर अत्याचाराच्या घटनेवरही भाष्य केले.
ते म्हणाले की, शिंदेला गोळी मारणं हे योग्यच होतं. त्याचा गुन्हाच तसा होता. आनंद दिघे जरी असते त्यांनी देखील पहिली गोळी शिंदेला घातली असती असे ठाकरे म्हणाले.
बदलापूर अत्याचारातील आरोपीच्या एन्काउंटरवर बोलताना ठाकरे म्हणाले की, नराधम शिंदेला गोळ्या घालायलाच पाहिजे होत्या. आनंद दिघे जर असते तर, त्यांनी देखील या पापासाठी शिंदेला गोळी घातलीच असती. महिलांवर अत्याचार करणाऱ्या शिंदेला गोळी घातली ते बरचं झालं. शिंदेला गोळी घातली याचं दुःख नाही. त्याला मारायलाच पाहिजे होता. पण, शिंदेला मारल्यानंतर जसं आपल्या मराठीत म्हणतात की, म्हातारी मेली त्याचं दुःख नाहीये पण काळ सोकावतोय असे ठाकरे म्हणाले. शिंदेला गोळी घातली कारण या प्रकरणात ज्यांचा सहभाग होता त्या सर्वांना वाचवण्यासाठी आणि पुरावे नष्ट करण्यासाठी तुम्ही शिंदेला गोळी घातली असेल. त्यामुळे या गोष्टीचादेखील उलगडा झाला पाहिजे. महिलांवर अत्याचार करणारे शिंदे जगायच्या लायकीचे नाही, असेही ठाकरे म्हणाले.