महाराष्ट्र

ब्रेकिंग! गर्व से कहो हम हिन्दू हैं ही सिंहगर्जना बाळासाहेबांची होती पण आता

जमलेल्या माझ्या हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो अशी घोषणा देत जेव्हा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे भाषण करायचे तेव्हा आमच्या अंगावर काटा यायचा. पण हल्ली काही लोकांना हिंदु हा शब्द बोलायला लाज वाटते. काहींची जीभ आता कचरायला लागली आहे. पण आपल्याला हा शब्द उच्चारायला सन्मान वाटतो. पण हिऱ्यापोटी जन्मलेल्या लोकांना आता त्याचीच लाज वाटू लागली आहे, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि गटावर निशाणा साधला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळावा मुंबईतील आझाद मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. यावेळी शिंदे गटातील नेत्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. 

आपले सरकार राज्यात आल्यावर आपण राज्याला नंबर वन बनवले. सहा महिन्यात राज्य पहिल्या नंबरवर आणले याचा मला अभिमान आहे. कोरोनाला घाबरून घरात लपून बसणारा हा मुख्यमंत्री नाही. लोकांना मदत करण्यासाठी रस्त्यावर उतरणारा हा मुख्यमंत्री आहे. सरकार बदललं नसतं तर लाखो कोटींची प्रकल्प थांबले असते, कल्याणकारी योजना थांबल्या असत्या. लाडकी बहीण योजना आली नसती, शासन आपल्या दारी आले नसते, असा विकासकामांचा पाढा मुख्यमंत्री शिंदे यांना वाचला.

Related Articles

Back to top button