महाराष्ट्र
ब्रेकिंग! जुन्या वाहनधारकांसाठी मोठी खुशखबर

- केंद्र सरकारने देशातील जुन्या वाहनधारकांसाठी मोठी खुशखबर दिली आहे. सरकारने 15 वर्षे जुने वाहन 20 वर्षांपर्यंत रस्त्यावर चालवण्यास परवानगी दिली आहे. मात्र, यासाठी रजिस्ट्रेशन रिन्यूअल बंधनकारक राहणार असून ही प्रक्रिया आता अधिक खर्चिक ठरणार आहे. हा नवा नियम सेंट्रल मोटर व्हेइकल्स रूल्स (तिसरा दुरुस्ती), 2025 अंतर्गत लागू करण्यात आला आहे. तो 20 ऑगस्टपासून संपूर्ण देशात (दिल्ली-एनसीआर वगळता) लागू झाला आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये आधीपासूनच 15 वर्षांपेक्षा जुने पेट्रोल वाहन आणि 10 वर्षांपेक्षा जुने डिझेल वाहन बंदीस्त आहेत. त्यामुळे हा निर्णय त्या भागासाठी लागू होणार नाही.
- 15 वर्षे जुने वाहन आता पाच वर्षांसाठी रिन्यू करून जास्तीत जास्त 20 वर्षे रस्त्यावर चालवता येईल. मात्र, यासाठी ऑटोमेटेड टेस्टिंग स्टेशनकडून फिटनेस टेस्ट उत्तीर्ण करणे बंधनकारक असेल. दर पाच वर्षांनी रिन्यूअल करावे लागेल.
- वाढीव फी (जीएसटी वेगळे)
- मोटरसायकल : ₹2,000 (पूर्वी ₹300)
- थ्री-व्हीलर/क्वाड्रिसायकल : ₹5,000
- हलके मोटर वाहन (कार) : ₹10,000 (पूर्वी ₹600)
- इम्पोर्टेड टू-व्हीलर : ₹20,000
- इम्पोर्टेड फोर-व्हीलर : ₹80,000
- इतर वाहन : ₹12,000
- टॅक्सी : ₹7,000 (पूर्वी ₹1,000)
- बस/ट्रक : ₹12,500 (पूर्वी ₹1,5000)
- उशीर केल्यास दंड
- खासगी वाहन : 300 रूपये प्रति महिना
- कमर्शियल वाहन : 500 प्रति महिना



