महाराष्ट्र

ब्रेकिंग! सहलीला गेलेल्या बसचा अपघात

सहलीला गेलेल्या खासगी क्लासच्या बसला बारामतीत अपघात झाला आहे. या अपघातात ३ मुली गंभीर जखमी झाल्या असून २४ विद्यार्थींनी किरकोळ जखमी आहेत. चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात घडला आहे.
इचलकरंजी येथील सागर क्लासेसमधील आठवी ते दहावीच्या विद्यार्थींनीची सहल औरंगाबाद आणि शिर्डी येथे नेण्यात आली होती. औरंगाबादेत अजिंठ्या लेण्या पाहून झाल्यानंतर बस शिर्डीला गेली. शिर्डीहून ही बस पुन्हा इचलकरंजीच्या दिशेने येत होती.
ही बस बारामती येथील पाहुणेवाडी गावच्या हद्दीत आल्यानंतर एका चरीत शिरली. चालकाला डुलकी लागल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे हा अपघात घडला. यात २४ मुली किरकोळ आणि ३ मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. या बसमध्ये ४८ मुली आणि ५ कर्मचारी होते.

Related Articles

Back to top button