क्राईम

प्रेम प्रकरणातून घात झाला!

राज्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेयसीला लॉजवर बोलवून तिची हत्या केल्यानंतर तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पिंपरी चिंचवडच्या खराळवाडी परिसरातील हॉटेल राज प्लाझामध्ये ही घटना घडली. प्रेयसीची चाकूने वार करून हत्या केल्यानंतर प्रियकराने लॉजच्या खोलीतच गळफास घेऊन आपले जीवन संपवले.

नितेश नरेश मिनेकर आणि करिश्मा ईश्वर घुमाने असे या मृत प्रेमी युगुलाचे नाव आहे. प्रियकराच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या करिश्माला तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

पिंपरीमधल्या खराळवाडीत असलेल्या हॉटेल राज पॅलेस या लॉजवर काल दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. चार वाजण्याच्या सुमारास या दोघांनी लॉजवर रूम बुक केली होती. मात्र त्यानंतर त्यांच्या खोलीतून भांडणाचे आवाज येऊ लागल्यानंतर लॉजमधील कर्मचाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत हॉटेलच्या रूमचा दरवाजा ठोठावला. आतमधून नितेशचा प्रतिसाद येत होता. तो म्हणत होता की, थोडा वेळ थांबा. 

दरम्यान बराच वेळ झाला तरी नितेश दरवाजा उघडत नसल्यामुळे पोलिसांनी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. आतील दृष्य पाहून त्यांना धक्का बसला. करिश्मा रक्ताच्या थोराळ्यात पडली होती तर नितेशने गळफास लावून आपले जीवन संपवले होते. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून नेमका या दोघांमध्ये कशावरून वाद झाला? याचा तपास पोलीस करत आहेत. हा सर्व प्रकार प्रेम प्रकरणातून झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. 

Related Articles

Back to top button