सोलापूर
रतन टाटांचा लाडका श्वान ‘गोवा’चे छत्र हरपले
भारताचे ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी बुधवारी रात्री निधन झाले. मागचे काही दिवस त्यांच्यावर मुंबईच्या ब्रीज कॅण्डी रुग्णालयात उपचार सुरू होते. रतन टाटा यांच्या मृत्यूने देशभरात शोककळा पसरली आहे.
रतन टाटा यांचं पार्थिव दर्शनासाठी मुंबईतल्या एनसीपीएमध्ये ठेवण्यात आलं होतं.
रतन टाटा यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी त्यांचा आवडता ‘गोवा’ नावाचा श्वानही आला होता. रतन टाटा यांचे श्वान गोवा याने त्यांचे अंत्यदर्शन घेतले. 8 वर्षांपूर्वी गोव्यामध्ये रतन टाटा यांना रस्त्यावर फिरत असलेले एक श्वान सापडले होते , या श्वानाला रतन टाटा यांनी मुंबईत आणून हे श्वान गोव्यात सापडल्यामुळे त्याचे नाव गोवा ठेवण्यात आले होते. 8 वर्षांपासून गोवा रतन टाटा यांच्यासोबत शेवटपर्यंत कायम राहिला आहे.
रतन टाटा यांच्या श्वानप्रेमाबबद्दल सर्वांनाच माहिती आहे. रतन टाटा यांच्या बॉम्बे हाऊस या मुख्यालयातही अनेक भटकी कुत्री फिरत असतात. गोवा हा श्वान रतन टाटा यांच्या ऑफिसमध्येच राहायचा आणि रतन टाटा यांच्या सगळ्या मीटिंगही अटेंड करायचा, अशी माहिती समोर येत आहे.