बिजनेस

इराण-इस्रायल संघर्षाचे पडसाद

इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सरकारने भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होणार का यावर उत्तर दिले आहे. जेव्हापासून इराण आणि इस्रायल यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे, तेव्हापासून कच्च्या तेलाच्या किमतीत दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात आखाती देशांच्या कच्च्या तेलाने प्रतिबॅरल 78 डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. या संपूर्ण प्रकरणावर पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सविस्तर माहिती दिली आहे. मंत्री पुरी यांनी सांगितले की, पश्चिम आशियातील वाढत्या संकटामुळे जागतिक कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. 

भारत परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 70 डॉलर्सवरून 78 डॉलर प्रति बॅरलपर्यंत वाढल्या आहेत.
तेलाच्या किमती कमी होण्याबद्दल पुरी यांना विचारले असता ते म्हणाले की, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बाजारावर आधारित असतात आणि पेट्रोलियम कंपन्या किंमतीबाबत निर्णय घेतात. परिस्थिती बिघडणार नाही याची काळजी घेतली जात आहे, असे ते म्हणाले. 

Related Articles

Back to top button