बिजनेस

ब्रेकिंग! नववर्षाच्या सकाळी बदलणार हे नियम

  • दर महिन्याच्या पहिल्या तारखेला अनेक बदल होत असतात. या वेळेला जानेवारीची पहिली तारीख नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. या दिवसापासून देशभरात अनेक नियम लागू होणार आहेत. ज्यामुळे नागरिकांच्या दैंनदिन जीवनावर थेट परिणाम होणार आहे.
  • नवीन वर्षात काय-काय बद्ल होणार आहे. हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्हाला नवीन वर्षात कोण-कोणते बदल होणार आहेत हे माहिती नसेल तर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. एक जानेवारी 2025 पासून कोणते नियम बदलणार आहेत ते जाणून घेऊया…
  • एलपीजी सिलेंडरच्या किंमती : दर महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्या एलपीजी सिलेंडरच्या किमतींचा आढावा घेऊन नवीन दर जाहीर करतात. व्यावसायिक सिलेंडरच्या किमती गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वाढत होत आहे. दरम्यान घरगुती सिलेंडरच्या (14.2 किलो) किंमती स्थिर आहेत. जानेवारीत महिन्यात आता काय बदल होतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
  • शिधापत्रिकेत बदल : सरकारने शिधापत्रिकाधारकांसाठी नवीन व्यवस्था लागू केली आहे. जेणेकरून लोकांना अधिक पारदर्शकतेने सुविधा मिळतील. हे नवीन नियम लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतील.
  • कारच्या किंमतीत वाढ: देशातील अनेक ऑटोमोबाईल कंपन्यांनी कारच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढ 1 ते 3 टक्क्यांपर्यंत असू शकते.
  • व्हॉट्सॲप : एक जानेवारी 2025 पासून व्हॉट्सॲप ऑपरेटिंग सिस्टमच्या जुन्या व्हर्जनवर चालणाऱ्या अनेक अँड्रॉइड फोनला सपोर्ट करणार नाही. यामध्ये सॅमसंग, एलजी, सोनी, एचटीसी आणि मोटोरोला यांसारख्या लोकप्रिय ब्रँडच्या मॉडेल्सचाही समावेश आहे.

Related Articles

Back to top button