राजकीय

‘तुतारी’ फुंकताच हर्षवर्धन पाटलांचा नवा धमाका

भाजप नेते हर्षवर्धन पाटलांनी ज्येष्ठ नेते शरद पवार पक्षात प्रवेश करताच मोठा गौप्यस्फोट केला आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना विजयी करण्यात आमचा अदृष्य सहभाग होता, असा मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांच्या या विधानाने खळबळ उडाली आहे.
पक्ष प्रवेशावेळी बोलताना पाटील म्हणाले की, सुप्रियाताई आम्हाला अभिमान आहे की, तुम्ही चारवेळा खासदार झाला. त्यातील तीनवेळा तुमच्या विजयात आमचा प्रत्यक्ष सहभाग होता. पण कालपरवा पार पडलेल्या निवडणुकीत तुम्हाला विजयी करण्यात आमचा सहभाग अदृष्य होता. पाटलांनी भर कार्यक्रमात वरील गौप्यस्फोट केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून पाटलांच्या या खुलाश्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या बारामतीतील पराभव आणि इंदापूरातील सुप्रिया सुळे यांच्या लीडमागे कोणाचा हात होता, यावरून अखेर पडदा उचलला गेला आहे.

Related Articles

Back to top button