ब्रेकिंग! पुढील पाच वर्षात काय करणार?

केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत आज भाजपची महत्त्वाची बैठक झाली. त्यानंतर भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी एकमुखाने निवड केली. यानंतर आता राज्यपालांकडे महायुतीतर्फे सत्तास्थापनेचा दावा केला जाणार आहे.
जनतेने इतका मोठा जनादेश दिला आहे की, या जनादेशातून मी इतकेच म्हणेन की आनंद आहे आणि जबाबदारीसुद्धा वाढली आहे. जबाबदारीची जाणीव करून देणारा जनादेश असल्याचे म्हणत फडणवीस यांनी विशेषत: लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके युवा, लाडके शेतकरी या सर्वांनी समाजातील दलित, वंचित, ओबीसी, आदिवासी या सर्वांनी दिलेल्या जनादेशाचा सन्मान राखण्याचे काम आपल्याला करावे लागेल, याची कल्पना आमदारांना दिली.
त्या काळात आपली प्राथमिकता आपण सुरू केलेल्या योजना आणि दिलेली आश्वासने पूर्ण करणे याकडे लक्ष्य असेल, असे फडणवीस म्हणाले. महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी आणि सर्व आघाड्यांवर पहिल्या क्रमांकावर आणण्याकरता आपणा सर्वांना सतत प्रयत्नशील रहावे लागेल, असा आश्वासक सूर फडणवीस यांनी आळवला.