महाराष्ट्र

…तर लाडकी बहीण योजना बंद होईल

  • राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेला सोलापूरसह अन्य भागात मोठा प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, राज्यातील बहिणींच्या खात्यात दर महिना दीड हजार रुपये जमा होत आहेत. महाविकास आघाडीला हे पाहावत नाही. महाविकास आघाडीला संधी मिळाली तर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर राग काढतील. शिंदे यांनी सुरु केलेल्या सर्व योजना त्या बंद करतील. बहिणींच्या हातामधील पैसा दलालांच्या हातामध्ये जाईल, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. मोदी यांच्या हस्ते काल ठाण्यात मेट्रो 3 च्या पहिल्या टप्प्यासह वेगवेगळ्या विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन झाले. त्यावेळी ते बोलत होते.
    आज काँग्रेस अर्बन नक्षल चालवत आहेत. काँग्रेस उघडपणे त्यांच्यासोबत उभी आहे. सरकार बनवण्याचे स्वप्न पाहात आहे. काँग्रेसला त्यांची व्होटबँक एक राहील पण, बाकीचे लोक सहज वेगळे होतील, असे वाटत आहे. समाजाची विभागणी करा, लोकांची विभागणी करा हाच काँग्रेसचा हेतू आहे. आम्हाला भूतकाळापासून बोध घ्यावा लागेल. ‘हम बटेंगे तो बाटनेवाले मैफिल सजायेंगे’ हे लक्षात ठेवा. काँग्रेसचे मनसुबे पूर्ण होऊ देऊ नका, असे आवाहन मोदी यांनी केले.

Related Articles

Back to top button