महाराष्ट्र

लाडक्या बहिणींची दसरा, दिवाळी झाली गोड

राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेला सोलापूरसह अन्य भागात मोठा प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान,
राज्य सरकारने जुलैपासून ही योजना चालू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना दीड हजार रुपये दर महिन्याला मिळतात. नुकताच या योजनेचा तिसरा हप्ता सरकारने महिलांच्या खात्यात जमा केलेला आहे. अशातच आता दसरा आणि दिवाळी तोंडावर आलेली आहे आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन सरकारने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे दिवाळीच्या आधी देण्याचे ठरवलेले आहे. त्यामुळे आता पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे तीन हजार रुपये येण्यास सुरुवात झालेली आहे.
या आधी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले होते की, दिवाळी आधी महिलांना भाऊबीज देणार आहेत. म्हणजेच आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे एकत्र महिलांच्या खात्यात येणार आहेत. त्यामुळे काही महिलांच्या खात्यामध्ये आजपासूनच तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.
दरम्यान या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे बँक खात्याला त्यांच्या आधार कार्ड क्रमांक लिंक असणे खूप गरजेचे असते. त्यांचा आधार कार्ड क्रमांक बँक खात्याशी लिंक नाही, त्यांना पैसे मिळत नाही. 

Related Articles

Back to top button