सोलापूर

सोलापुरातील तरुणाचा खून

सोलापूर शहरातील विजापूर नाका परिसरात राहणारा 21 वर्षीय तरुणाला शुक्रवारी (दि.4) ऑक्टोबर रोजी आठ ते दहा जणांनी जबर मारहाण केली. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी शहरातील अश्विनी हॉस्पिटल येथे दाखल केले. परंतु काल त्याचा उपचाराचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद विजापूर नाका पोलीस ठाण्यात झाली आहे.
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, अथर्व दिनेश जाधव (वय-20, रा.03 सरस्वती बिल्डिंग, अमृत नगर, विजापूर रोड) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी मृताचे वडील दिनेश प्रकाश जाधव (वय-50, व्यवसाय खाजगी नोकरी, रा. 03 सरस्वती बिल्डिंग, अमृत नगर,विजापूर रोड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इंडियन मॉडेल इंटरनॅशनल शाळेच्या पाठीमागे रेणुका नगर येथील मोकळ्या मैदानात व तेथेच असणाऱ्या पत्र्याच्या शेडमध्ये सोलापूर ते अश्विनी हॉस्पिटल दरम्यान अथर्व जाधव यास पैशाच्या देण्याघेण्याच्या व्यवहारातून आठ ते दहा जणांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड हे करीत आहेत.
प्रसाद लोंढे ,बाळू काळे, सागर कदम, केदार गुमटे, मनोज सूर्यराव उर्फ भाईजी, अजिंक्य शाबादे, प्रकाश शिंदे उर्फ बुद्धा,जॉकी थोरात, विनायक जाधव व त्यांचे इतर साथीदार यांच्या विरोधात विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अत्यंत जखमी अवस्थेत अथर्वला तातडीने शहरातील अश्विनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.अथर्वच्या पश्चात वडील, आई, बहीण असा परिवार आहे. वाद पैशाच्या व्यवहारातून झाला आहे.

Related Articles

Back to top button