राजकीय

संजय राऊतांची जीभ घसरली!

राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु असताना केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. त्यावरून आता श्रेयवादाच्या लढाईला सुरुवात झाली आहे.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी कधीही प्रयत्न केले नाहीत असं विधान भाजप नेते नितेश राणे यांनी केलं होतं. यावर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदर संजय राऊत यांची जीभ पुन्हा एकदा घसरल्याचे दिसून आले आहे. यावरून आता नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी कधीही प्रयत्न केले नाहीत, असे वक्तव्य भाजप नेते नितेश राणे यांनी केले होते. याबाबत राऊत यांना विचारले तेव्हा नितेश यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना त्यांची जीभ पुन्हा एकदा घसरल्याचे दिसून आले. ‘चु…. आहे तो’ असे बोलत राऊत उठून निघून गेले. राऊत यांच्या या वक्तव्यावरून आता नव्या वादाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

Related Articles

Back to top button