ब्रेकिंग! सोलापुरात मोठा गोंधळ

मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस तापत आहे. मराठा समाजाच्या आरक्षणावरून राज्यातील विविध ठिकाणी आंदोलने केली जात आहेत. राज्यात मराठा आरक्षणाचे आंदोलन पेटले आहे. दरम्यान, मराठा आंदोलक पेटलेले असतानाच मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नये म्हणून ओबीसी समाजही आक्रमक झाला आहे. आता धनगर समाजही आरक्षणासाठी आक्रमक झाला असून या आंदोलकांनी आज थेट सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळून निषेध नोंदवला आहे.
विखे पाटील हे सोलापूर येथील शासकिय विश्रामगृहात थांबले होते, यावेळी धनगर आरक्षण कृती समितीचे कार्यकर्ते त्यांना निवेदन देण्यासाठी आले. या कार्यकर्तांनी विखे पाटील निवेदन स्वीकारत असताना त्यांच्या अंगावर भंडारा टाकला आहे.
दरम्यान, मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास कुणबी समाजाने तीव्र विरोध केला आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिल्यास आम्ही आंदोलन करू, महाराष्ट्र बंद ठेवू, असा इशारा सकल कुणबी समाजाच्यावतीने देण्यात आला आहे.