सोलापुरातील सोनालीचा भयंकर छळ

सोलापूर (प्रतिनिधी) विवाहिता ही सासरी नांदत असताना तिला सासरकडच्या मंडळींनी मिळून लग्नात योग्य मानपान केला नाही, सोने घातले नाही, हुंडा दिला नाही. यावरून बोलून रात्री उशिरा शिळे खायला देऊन दुकानातील व घरातील कामे लावून त्रास दिला.
त्यानंतर माहेरच्या लोकांना फोनवर बोलण्यास न देता किरकोळ कारणावरून मारहाण केली. तसेच विवाहितेच्या पतीने आपले घटस्फोट झाले आहे. असे म्हणून तू आता माहेरी जा असे बोलत घरातून हाकलून दिल्याची फिर्याद सोनाली सत्यकुमार शेठ (वय-३८ ,रा. नाईकवाडी नगर, अक्कलकोट रोड) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली आहे.
त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती सत्यकुमार, सासरे महेंद्रकुमार, सासू ज्योतीबेन, दीर हिरनेकुमार व जाऊ मोनलबेन (सर्व राहणार वर्धमान कॉलनी, वाढवण, जिल्हा-सुरेंद्



