महाराष्ट्र

ब्रेकिंग! शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय

राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षेवेळी अनेक वेळा कॉपी केल्याची प्रकरण समोर येत असतात. परंतु आता या कॉपी प्रकाराला आळा घालण्यासाठी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मोठा निर्णय घेतला आहे.

CBSE परीक्षेच्या धरतीवर राज्यात आता परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही लावण्यात येणार आहे. राज्य मंडळाच्या या धोरणामुळे परीक्षा केंद्रावरील सर्वच गैरप्रकारांना आळा बसण्यास मदत होणार आहे. दिवाळीनंतर दहावी आणि बारावीच्या परीक्षा केंद्राच्या झाडाझडतीला ही सुरुवात होणार आहे. विद्यार्थी सुरक्षा आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी त्याचबरोबर विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आतापर्यंत अनेक वेळा सीसीटीव्ही बसवा आणि त्याचे स्टोरेज करण्याची चांगली क्षमता असावी, अशा सूचना शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना खूप वेळा देण्यात आल्या आहेत. परीक्षा केंद्रावर आता सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहे. त्यामुळे कॉपी करणारे विद्यार्थी, त्यांना मदत करणारे नातेवाईक आणि काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सीसीटीव्हीचा जालीम उपाय करण्यात आला आहे.

Related Articles

Back to top button