महाराष्ट्र

राज्यातील 72 वरिष्ठ अधिकारी, माजी मंत्री हनी ट्रॅपच्या जाळ्यात?

  • महाराष्ट्राच्या राजकारणात आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळजनक उडवून देणारी बातमी समोर आली आहे. नाशिक दौऱ्यावर असलेल्या राज्यातील एका बड्या नेत्याने अनौपचारिक गप्पांदरम्यान एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. राज्यातील तब्बल ७२ वरिष्ठ अधिकारी आणि काही आजी-माजी मंत्री ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकल्याची शक्यता वर्तवली आहे. हे प्रकरण फक्त हनी ट्रॅपची आहेत का? अधिकाऱ्यांच्या रासलीला आहेत, हे समोर येणे बाकी आहे. मात्र यामुळे वातावरण तापले आहे.
  • नाशिकमधील एका बड्या अधिकाऱ्याचाही या प्रकरणात समावेश असल्याची थेट चर्चा आहे. हा प्रकार नाशिकमधील एका पंचतारांकित सुविधा असलेल्या हॉटेलमध्ये घडल्याचेही बोलले जात आहे. या संदर्भात नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात एका महिलेने तक्रार दाखल केल्याची माहिती आहे. संबंधित अधिकाऱ्यांचे आणि नेत्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ असल्यामुळे कोणीही अधिकारी किंवा नेता या ट्रॅपबद्दल उघडपणे समोर येण्यास तयार नाही. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण सध्या गुलदस्त्यात आहे, अशी माहिती समोर येत आहे.
  • हे प्रकरण गंभीर असल्याचे पाहायला मिळत आहे. एका बड्या नेत्याने केलेल्या या गौप्यस्फोटामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या प्रकरणात नाशिकसह मुंबई आणि पुणे येथील बड्या अधिकाऱ्यांचा आणि नेत्यांचा सहभाग असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या हनी ट्रपमध्ये नेमके कोणते अधिकारी किंवा मंत्री अडकले आहेत, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Related Articles

Back to top button