महाराष्ट्र

ब्रेकिंग! अडवाणींना भारतरत्न म्हणजे एका दंगलखोराने दुसऱ्या दंगेखोराला दिलेली शाबासकी

पुणे शहरात सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, कायदेतज्ज्ञ असीम सरोदे आणि वादग्रस्त पत्रकार निखिल वागळे यांच्या निर्भय बनो सभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण वागळे यांचे भाषण होते. मात्र, या सभेला उधळून लावू, असा इशारा भाजपाने दिला होता. त्यानुसार भाजपा कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाला जोरदार विरोध केला. तसेच पुण्यातील खंडूजी बाबा चौक येथे वागळेंच्या वाहन फोडण्यात आले. वाहनावर अंडी आणि दगडफेक केली.
वागळेंनी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न मिळाल्यानंतर ट्विट करून भाजपावर हल्ला चढवला होता. अडवाणींना भारतरत्न म्हणजे एका दंगलखोराने दुसऱ्या दंगेखोराला दिलेली शाबासकी!, अशा कडक शब्दात वागळेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. यावरूनच भाजपा कार्यकर्ते आक्रमक झाले होते. यानंतर पुण्यात वागळेंच्या होणाऱ्या कार्यक्रम होऊ देणार नसल्याचा इशारा दिला होता.
दरम्यान, वागळे यांचा निर्भय बनो हा कार्यक्रम पुण्यात होणार होता. हा कार्यक्रम होऊ देणार नसल्याचा इशारा भाजपच्यावतीने देण्यात आला होता. देशात भयमुक्त वातावरण असताना चार टाळकी निर्भय बनो हा आपला अजेंडा रेटत आहेत. त्यांचा हा अजेंडा उधळून लावण्यात येईल, असा इशारा भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिला होता. त्यानंतर पुण्यात आलेल्या वागळेंवर भाजपा कार्यकर्त्यांनी हल्ला केला. त्यांची गाडी फोडली. गाडीवर अंडी, शाई फेकण्यात आली.

Related Articles

Back to top button