महाराष्ट्र

मोठी बातमी! महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कधी?

केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दोन दिवसीय दौऱ्यात त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. 
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी निवडणूक आयुक्त राजीव कुमार ते म्हणाले, महाराष्ट्र दौऱ्यात आम्ही 11 पक्षांशी चर्चा केली आहे. आम्ही आमचा महाराष्ट्र, आमचं मतदान अशी टॅगलाईन घेतली आहे. 

दिवाळी, देव दिवाळी असे सण येत्या काळात आहेत. त्या गोष्टी पाहूनच निवडणुका जाहीर कराव्यात. निवडणुकीच्या तारखा जाहीर करताना सलग सुट्ट्या असू नयेत, याची काळजी घ्यावी, आठवड्यातील मधल्या दिवशी निवडणुका घ्यावात, जेणेकरून लोक सुट्टी घेऊन बाहेर जाऊ नयेत, अशी सूचना राजकीय पक्षांनी दिल्याचे आयुक्तांनी सांगितले. २६ नोव्हेंबर रोजी विधानसभेचा कार्यकाळ संपणार आहे. त्याआधी राज्यात विधानसभेच्या निवडणुका व्हायला हव्यात, असेही त्यांनी यावेळी सूचित केले.

Related Articles

Back to top button