बिजनेस
एक ऑक्टोबरपासून ‘या’ गोष्टींमध्ये होणार मोठे बदल
- देशभरातील नागरिकांसाठी महत्वाची बातमी आहे. एक ऑक्टोबरपासून काही नियमांमध्ये बदल होणार आहेत, त्यापैकी बहुतांश नियम हे कराशी संबंधित आहेत. एक तारखेपासून आधार कार्डपासून प्राप्तिकरापर्यंत मोठे बदल होणार आहेत.
- आधार क्रमांकाऐवजी आधार नोंदणी आयडीचा वापर करण्याची परवानगी देणारी तरतूद केंद्रीय अर्थसंकल्प 2024 मध्ये बंद करण्याचा प्रस्ताव पारित झाला होता.
- त्यामुळे आता आधार नोंदणी क्रमांक वापरता येणार नाही. पॅनचा गैरवापर कमी करणे हा या निर्णयाचा उद्देश आहे. आता एक ऑक्टोबरपासून पॅन कार्डच्या अर्जामध्ये आणि त्यांच्या आयकर रिटर्नमध्ये त्यांचा आधार नोंदणी आयडी नमूद करू शकणार नाहीत. कलम 139AA नुसार पात्र व्यक्तींनी एक जुलै 2017 पासून पॅन अर्ज आणि आयकर रिटर्नमध्ये आधार क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे.
- ऑईल मार्केटींग कंपन्या महिन्याच्या पहिल्याच दिवशी सिलेंडरच्या किंमतींमध्ये बदल करत असतात. त्यामुळे एक ऑक्टोबरला सकाळी ६ वाजताच नवे दर जाहीर केले जाऊ शकतात. यंदा दिवाळी आधी गॅस सिलेंडरच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे.
- वित्त मंत्रालयाने नॅश्नल स्मॉल सेव्हिंग स्किममध्ये चुकीच्या पद्धतीने खाती खोललेल्या व्यक्तींसाठी नवी निर्देश जाहीर केले आहेत. यामध्ये पीपीएफ, सुकन्या समृद्धी सारखी खाती दुरुस्त केली जाणार आहेत.