महाराष्ट्र
ब्रेकिंग! लाडकी बहीण योजनेचे पैसे नोव्हेंबरपर्यंतच मिळतील
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी गप्पा करताना त्यांनी लाडकी बहीण योजनेबाबत एक वक्तव्य केले आहे.
लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोंबरचा हप्ता दिल्यानंतर शासनाकडे सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार द्यायलाही पैसे राहणार नाही आणि तिजोरी रिकामी होईल. महिलांना असे पैसे देण्यापेक्षा त्यांच्यासाठी नवनवीन उद्योग आणले पाहिजे. त्यांना रोजगार देऊन सक्षम केले पाहिजे.
समाजातील कोणताही घटक फुकट काही मागत नाही. सत्ताधाऱ्यांच्या स्वार्थासाठी योजना असेल तर परिणाम वाईट होतो. राज्य खड्ड्यात घातले जात असेल तर ते चुकीचे आहे. ऑक्टोंबरचा हप्ता दिल्यानंतर जानेवारीत तिजोरीत ठणठणाट होऊ शकतो. तसेच या योजनेचे पैसे फक्त नोव्हेंबरपर्यंतच मिळतील, असेही राज यांनी म्हटले आहे.