सोलापूर
ब्रेकिंग! प्रणिती शिंदेंच्या विधानसभा मतदारसंघात कोण?

सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी महाविकास आघाडीला अस्वस्थ करणारे वक्तव्य केले आहे. सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात कोण उमेदवार असणार यावर त्यांनी भाष्य केले आहे.
प्रणिती यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य आणि केंद्र सरकावर घणाघाती टीका केली. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीवरही भाष्य केले. सोलापूर शहर मध्यची जागा काँग्रेस पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ताच लढणार आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात चर्चा होईलच. पण मी माझे मत मांडले आहे.
सोलापूर शहर मध्य मतदारसंघ सध्या रिक्त आहे. प्रणिती आता खासदार आहेत. अशा परिस्थितीत ही जागा कुणाला द्यायची याचा निर्णय अद्याप झालेला नाही. महाविकास आघाडीच्या जागावाटपात याचा निर्णय होईल. येथे काँग्रेसचा आमदार होता त्यामुळे सहाजिकच ही जागा काँग्रेसलाच मिळणार असे सांगितले जात आहे. स्थानिक काँग्रेस नेत्यांनी तशी तयारीही केली आहे. जागावाटपातही हा मतदारसंघ काँग्रेसलाच मिळणार याची खात्री काँग्रेस नेत्यांना आहे. दरम्यान निर्णय अजून बाकी आहे. मात्र त्याआधीच ही जागा काँग्रेसला मिळणार असल्याचे खासदार शिंदे यांनी सांगून टाकले आहे.



