बिजनेस
TVS Raider 125 बाईक लाँन्च
आता देशात सणासुदीचा हंगाम सुरू झाला आहे आणि यावेळी म्हणजे वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत देशात सर्वाधिक वाहने विकली जातात. याचा फायदा घेण्यासाठी आणि ग्राहकांना त्याचे फायदे मिळवून देण्यासाठी वाहन उत्पादक कंपन्या वाहनांवर डिस्काऊंट देत आहेत, तर यावेळी नवीन मॉडेल्सही लाँन्च केले जातात.
TVS ने या हंगामाच्या सुरुवातीला नवीन Raider 125 चे सर्वात स्वस्त व्हेरिअंट लॉन्च केले, जे ड्रम ब्रेकसह येते. त्याची एक्स शोरूम किंमत 84,469 रुपये आहे. जी बाईकच्या सिंगल सीट वेरिएंटपेक्षा 11,000 रुपये कमी आहे.
स्ट्राइकिंग रेड आणि विक्ड ब्लॅक या दोनच रंगांमध्ये ही बाईक उपलब्ध करून देण्यात आली आहे. नवीन TVS Raider 125 ड्रम ब्रेक वेरिएंटची रचना पूर्वीसारखीच आहे, तर ग्राफिक्समध्ये कोणताही बदल केलेला नाही. सिंगल सीट आणि ड्रम ब्रेक्स व्यतिरिक्त, नवीन व्हेरियंटमध्ये सर्वत्र एलईडी लाइटिंग आणि मल्टीपल राइड मोडसह एलईडी क्लस्टर देण्यात आला आहे.