बिजनेस
लेटेस्ट Samsung Galaxy S24 FE स्मार्टफोन लाँच!

स्मार्टफोन निर्माता Samsung ने दीर्घ प्रतीक्षेनंतर Samsung Galaxy S24 FE फोन लाँच केला आहे. केवळ फोनच नाही तर, कंपनीने यासह Galaxy Tab S10+ आणि Galaxy Tab S10 Ultra देखील सादर केले आहेत.
फोनला पाणी आणि धुळीपासून संरक्षणासाठी कंपनीने या फोनला IP86 रेटिंगसह लाँच केले आहे. यामध्ये कंपनीची इन-हाउस चिप उपलब्ध आहे. हा फोन अनेक भारी फीचर्ससह येतो. या फोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत USD 649.99 म्हणजेच अंदाजे 54,355 रुपये आणि 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत USD 709.99 म्हणजेच अंदाजे 59,370 रुपये आहे. हे फोन तीन ऑक्टोबरपासून बाजारपेठांमध्ये उपलब्ध होतील. ब्लू, ग्रेफाइट, ग्रे, मिंट आणि यलो या चार कलर ऑप्शन्समध्ये सादर केले गेले आहेत.
या स्मार्टफोनमध्ये 4700mAh बॅटरी आहे, जी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. यात रिव्हर्स वायरलेस चार्जिंगसाठीही सपोर्ट आहे. फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50MP मुख्य कॅमेरा, 12MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आणि 8MP टेलिफोटो लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या पुढील बाजूस 10MP कॅमेरा आहे.



