सोलापूर
ब्रेकिंग! कॅन्टीन बंद करण्याच्या कारणावरून सोलापुरात राडा

सोलापूर (प्रतिनिधी) कॅन्टीन बंद का करत नाही या कारणावरून पोटात चाकू खूपसून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आठ जणांविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना २६ सप्टेंबर रोजी दुपारी पावणेचार वाजण्याच्या दरम्यान सिंहगड इन्स्टिट्यूट सोलापूर येथे घडली. याप्रकरणी दत्तात्रय ईश्वर नवले (वय-४१,व्यवसाय नोकरी, रा.सिंहगड स्टाफ कॉर्नर केगाव) यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
त्यांच्या फिर्यादीवरून संजय उपाळे, श्रीकांत, अमोघ, रोहित, दी पक, आरमान यांच्यासह दोन अज्ञात इसम (रा. माहित नाही) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
या घटनेची हकीकत अशी की,सिंहगड इन्स्टिट्यूट जवळील असलेल्या बोळात राहणारा संजय उपाळे यांची बहीण व भाऊ यांना सिंहगड कॉलेजमध्ये ते चालवत असलेले कॅन्टीन बंद का करत नाहीत या कारणावरून महिला हॉस्टेल जवळील आतील मेन गेट जवळ क्रूजर गाडी त्यांच्या सात ते आठ साथीदारांबरोबर येऊन फिर्यादी व महिला सिक्युरिटी गार्ड यांना हाता बुक्क्यांनी व दगडाने मारहाण केली. तसेच फिर्यादी यांच्या गळ्याला चाकू लावून फिर्यादीस जिव्या मारण्याचा प्रयत्न केला.दरम्यान फिर्यादी यांना वाचवायला आलेल्या कर्मचारी प्रकाश माळी याला जीवे मारण्याच्या उद्देशाने पोटात चाकू मारून गंभीर जखमी करत परत चाकू मारण्याचा प्रयत्न केला आहे. असे फिर्यादीत म्हटले आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील हे करीत आहेत.



