देश - विदेश

ब्रेकिंग! वक्फच्या नव्या कायद्याला सुप्रीम कोर्टाची अंतरिम स्थगिती

वक्फ सुधारणा विधेयक 2025 ला कॉंग्रेस, एमआयएमसह अनेकांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. त्यावरील दुसऱ्या दिवसाच्या सुनावणीनंतर सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी आपल्या अंतरिम आदेशात नवीन वक्फ कायद्याला अंतरिम स्थगिती दिली आहे. मात्र, ही स्थगिती संपूर्ण कायद्याला नाही तर त्यातील काही कलमांना आहे. तसेच काही मुद्द्यांबाबत केंद्र सरकारकडून उत्तरे मागितली असून त्यासाठी सात दिवसांचा वेळ देण्यात आला आहे. तोवर केंद्र सरकारने जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेशही सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. या प्रकरणी पुढील सुनावणी पाच मे रोजी होणार आहे.

कोणत्या दोन तरतुदीवर तात्पुरती स्थगिती?- वक्फ वापरत असलेली जमीन अथवा मालमत्तेची कोणतीही अधिसूचना जारी करू नये. वक्फ बोर्ड आणि परिषदांवर कोणतीही नियुक्ती करू नये.

Related Articles

Back to top button