महाराष्ट्र

पुन्हा तेच! भर दिवसा २० वर्षांच्या तरुणीवर अत्याचार

  • राज्यात लैंगिक अत्याचाराचे प्रमाण वाढतच जाताना दिसत आहे. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण ताज असतानाच राज्यात असेच अनेक प्रकार समोर आले. अशातच नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या २० वर्षांच्या तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. 
  • ही घटना रत्नागिरीमध्ये घडली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे तरुणीवर लैंगिक अत्याचारानंतर ती बेशुद्धावस्थेत आढळून आली आहे. तिला आता पुढील उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे. रत्नागिरीत नर्सिंगच्या विद्यार्थीनीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने संताप व्यक्त केला जात आहे. नर्सिंगचं शिक्षण घेणारी २० वर्षांची तरुणी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घरातून निघाली होती. कॉलेजला येण्यासाठी निघालेल्या या तरुणीवर भर दिवसा झालेल्या या घटनेमुळे रत्नागिरीत संतापाची लाट उसळली आहे.

Related Articles

Back to top button