सोलापूर

सोलापूर ब्रेकिंग! खासदार प्रणिती शिंदे यांची पुन्हा सतर्कता

लोकसभा निवडणुकीत माय बाप जनतेने प्रचंड बहुमताने विजयी केल्याबद्दल जनतेचे आभार मानण्यासाठी व त्यांच्या अडचणी जाणून घेऊन सोडविण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन गावभेट दौरा आयोजित केला असून आज रोजी मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यातील*
माचनुर (मंगळवेढा), पुळुज (पंढरपूर) या गावांना भेट देऊन गावातील जनतेचे प्रणितीताई शिंदे यांनी आभार मानले व ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या.
तसेच माचणुर बेगमपुर येथील जुना पुल, आंबेचिंचोली बंधारा, पंढरपूर येथील जुना दगडी पूल येथे भेट देऊन भीमा नदी पात्राची पाहणी केली उजनीतून पाणी सोडल्यामुळे सोलापूर जिल्ह्यात नदीकाठच्या गावात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी काहीही अडचण असल्यास संपर्क साधावे असे आवाहन केले. तसेच प्रशासनाने आपत्कालीन व्यवस्था करावी आणि नागरीकांना आवश्यक ते सुविधा पुरवून सहकार्य करावे असे आवाहन केले.
यावेळी प्रांताधिकारी, तहसिलदार, पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी, व इतर खात्याचे शासकीय अधिकारी उपस्थित होते.
नागरिक, शेतकरी बांधवांनी मांडलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी संबंधित विभागाचे शासकीय अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या.
आपल्या अनेक समस्या तत्काळ मार्गी लागल्याने व प्रश्नांचे निराकरण होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत आहेत.

Related Articles

Back to top button