क्राईम
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरण: उदयनराजे यांची हटके प्रतिक्रिया

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा काल पोलिसांनी एन्काऊंटर केला. या घटनेवर विरोधकांनी टीका केली.
या एन्काऊंटरवर साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आक्रमक होत प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणातील गुन्हेगाराला फार सहज मरण दिले. त्याला तुडवून मारण्याची गरज होती. विरोधी पक्षांनी या प्रकरणी घेतलेल्या भूमिकेवर देखील त्यांनी निशाणा साधला.
उदयनराजे भोसले हे माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले की, मला सत्ताधारी किंवा विरोधक यांच्याशी काहीही देणेघेणे नाही.त्यांच्या कुटुंबासोबत हा प्रकार घडला असता तर त्यांनी काय केले असते? अत्याचार झालेल्या मुलीच्या कुटुंबाला ज्या परिस्थितीला सामोरे जावे लागते, त्या कुटुंबाच्या जागेवर मी स्वतःला ठेवून बोलत असतो.
या घटनेतील आरोपीला गोळ्या घालून मारणे हे अतिशय सहज मरण झाले. अशा लोकांना जनतेत सोडले पाहिजे. त्यानंतर जनतेने त्यांना तुडवून मारले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात जी न्यायव्यवस्था होती त्या प्रकारची न्यायव्यवस्था आज झाली पाहिजे. त्यासाठी सरकारने कायद्यात योग्य तो बदल करावा. बलात्कार केला की सरळ लोकांपुढे आरोपीला फाशी द्या.