क्राईम

मित्रांनो, ट्रिपल सीट जाणे टाळा…

  • राज्यात एक भीषण अपघात झाला आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात कार आणि दुचाकीच्या भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन तरुण मित्रांचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे. कासा- सायवन मार्गावर बाईक आणि इको कारची समोरासमोर धडक झाल्याने हा भीषण अपघात झाला.
  • राहुल हरके (वय 20), चिन्मय चौरे (वय 19) आणि मुकेश वावरे (वय 20) अशी अपघातातील मृत तरुणांची नावे आहेत. ते बाईकवरून ट्रिपल सीट जात होते. 
  • कासा- सायवन मार्गावरून राहुल, चिन्मय आणि मुकेश हे तिघे एकाच दुचाकीवरून ट्रिपल सीट निघाले होते. त्यांच्या भरधाव बाईकने वाघाडी येथील गेल इंडिया कंपनीनजीक समोरून येणाऱ्या एका कारला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, इको कार जागीच उलटली. तर, अपघातात बाईकचा देखील चक्काचूर झाला.
  • दरम्यान भीषण अपघात झाल्याची माहिती मिळताच नागरिकांना घटनास्थळी गर्दी केली होती. स्थानिकांनी तातडीने अपघातग्रस्तांना कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तेथे त्यांना तपासून तरुणांना मृत झाल्याचे घोषित केले.

Related Articles

Back to top button