राजकीय

ब्रेकिंग! विधानसभेपूर्वीच राजकीय भूकंप होणार?

राज्याच्या राजकारणात अजितदादा पवार यांचा गट महायुतीतून बाहेर पडणार का, यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा गटाने स्वतंत्र निवडणूक लढवावी यासाठी भाजप आणि शिंदे गटाकडून दबाव आणला जात असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. भाजप आणि शिंदे गटाची रणनीती अजितदादा यांना वेगळे करून आपली ताकद वाढवण्याची आहे, असा कयास बांधला जात आहे.
राजकीय सूत्रांच्या मते, भाजप आणि शिंदे गट यांची हिंदुत्ववादी भूमिका आणि काँग्रेसविरोधी धोरण हे अजितदादा गटाला मान्य नसल्यामुळे त्यांच्यावर स्वतंत्र लढण्यासाठी दबाव आणला जात आहे. भाजपला आगामी विधानसभा निवडणुकीत १६० ते १७० जागा लढवण्याची इच्छा आहे तर शिंदे गटाला १०० जागांची अपेक्षा आहे. दुसरीकडे, अजितदादा गटाची किमान ६० जागांची मागणी आहे. मात्र, त्यांना २०-२५ जागाच मिळतील, अशी चर्चा सुरू आहे.

अजितदादा गटाने महायुतीतील काही घटकांवर नाराजी व्यक्त केली आहे. खासदार अनिल बोंडे आणि आमदार नितेश राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अजितदादा गट अस्वस्थ आहे. सुनील तटकरे यांनी या प्रकरणी थेट दिल्ली येथे तक्रार देणार असल्याचे म्हटले आहे. या सगळ्या घडामोडींमुळे महायुतीतील मतभेद अधिक उघड झाले आहेत.

Related Articles

Back to top button