बिजनेस

ब्रेकिंग! शेअर बाजारात नवा धमाका

शेअर बाजारात आज आठवड्याची सुरुवात जोरदार झाली. बाजार उघडताच सेन्सेक्स-निफ्टीने नवा उच्चांक गाठला. निफ्टीने पहिल्यांदाच 25,900 चा टप्पा पार केला आणि सेन्सेक्सनेही पहिल्यांदा 84,800 चा टप्पा पार केला. निफ्टी बँकेत किंचित वाढ झाली.
मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकातही तेजी दिसून आली. टाटा स्टील, एचडीएफसी लाइफ, ग्रासिम हे शेअर्स निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढले. त्याचवेळी व्होडाफोन आयडियाने सुमारे सहा टक्केची वाढ नोंदवली. शुक्रवारी अमेरिकन बाजारात संमिश्र कल होता. वॉल स्ट्रीटवर, डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज 0.09 टक्क्यांच्या किंचित वाढीसह बंद झाला. 

S&P 500 निर्देशांक 0.19 टक्क्यांनी घसरला आणि तंत्रज्ञान-केंद्रित निर्देशांक Nasdaq 0.36 टक्क्यांनी घसरला. 285 अंकांच्या वाढीसह सेन्सेक्स 84,825 अंकांच्या जवळ व्यवहार करत होता. तर NSE चा निफ्टी 50 निर्देशांक सुमारे 106 अंकांच्या वाढीसह 25,898.25 अंकांच्या जवळ होता. निफ्टीने काही मिनिटांच्या व्यवहारात 25,910 चे शिखर गाठण्यात यश मिळवले.

Related Articles

Back to top button