देश - विदेश
ब्रेकिंग! भारताचा पाकिस्तानवर आणखी एक स्ट्राईक

- पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारकडून पाकिस्तानवर कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबत असणारा सिंधू जल करार रद्द केला आहे. याच बरोबर देशात पाकिस्तानी नागरिकांची एन्ट्री बंद केली आहे. तर पाकिस्तानवर सैन्य कारवाई करण्याची देखील तयारी भारताकडून करण्यात येत आहे. आता पाकिस्तानवर भारताकडून आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे.
- भारताने आता पाकिस्तानमधून येणाऱ्या सर्व पोस्टल आणि पार्सल सेवांची देवाणघेवाण बंद केली असल्याची घोषणा केली आहे. भारताचा हा निर्णय हवाई आणि जमीन या दोन्ही मार्गांसाठी लागू करण्यात आला आहे. राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक धोरणाच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली.
- ऑगस्ट 2019 मध्ये जम्मू आणि काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानकडून टपाल सेवा बंद करण्यात आली होती. मात्र त्यानंतर पाकिस्तानने ही सेवा तीन महिन्यानंतर पुन्हा सुरु केली होती. मात्र, पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने सर्व प्रकारचे पोस्टल आणि पार्सल सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
- आता भारताने आयात संपूर्ण बंद केल्याने पाकिस्तानमधून सिमेंट उत्पादन टेक्स्टाईल आणि कृषी उत्पादन या क्षेत्रांना धक्का बसणार असून व्यापारामार्फत होणाऱ्या अवैध गोष्टी देखील थांबणार आहेत.



