महाराष्ट्र
ब्रेकिंग! मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसच
भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर विधिमंडळ गटनेते म्हणून शिक्कामोर्तब झाले आहे. भाजपच्या कोअर कमिटी बैठकीत फडणवीसांचे नाव फायनल करण्यात आले आहे. या बैठकीसाठी भाजपचे निरीक्षक विजय रुपाणी, निर्मला सीतारमण हे कालच मुंबईत दाखल झाले होते. विधीमंडळ गटनेत्याचा प्रस्ताव सुधीर मुनगंटीवर आणि चंद्रकांत पाटील यांनी मांडला आहे.
तर आशिष शेलार आणि रविंद्र चव्हाण यांनी अनुमोदन दिले. कोअर कमिटी बैठक संपल्यानंतर सीतारमन आणि रूपाणी आणि फडणवीस यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर सेंट्रल हॉलमध्ये गटनेतेपदाच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. या सर्व निवड प्रक्रियेनंतर आता फडणवीस हेच राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार, हे आता स्पष्ट झाले आहे.