महाराष्ट्र
आमदारांची मंत्रिपदासाठी ‘लॉबिंग’, पण, एकनाथ शिंदेंनी…

- राज्य मंत्रिमंडळ विस्तार उद्या मुंबईऐवजी नागपुरात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेत मोठ्या घड्यामोडी घडत आहेत. शिंदे सेनेतील बड्या नेत्यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळणार नसल्याची शक्यता आहे.
- त्यामुळे बड्या नेत्यांची धाकधूक वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर बडे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यास गेले होते. पण, त्यांना तब्बल पाच तास ‘वेटिंग’वर ठेवल्याची माहिती मिळत आहे.
- शिंदे सेनेतील वाचाळवीर आणि अकार्यक्षम असलेल्या नेत्यांना पुन्हा मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे तीन ते चार नेत्यांचा पत्ता कट होऊ शकतो. त्यात दीपक केसरकर, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, संजय राठोड यांच्यासारख्या बड्या नेत्यांचा समावेश आहे.
- हे नेते केवळ आश्वासन देतात. प्रत्यक्षात काम करत नाहीत, असा आरोप शिवसेनेचे आमदार खासगीत करतात. अब्दुल सत्तार यांच्या नावाला शिवसेनेसह भाजप आमदारांचाही विरोध असल्याची माहिती आहे.