क्राईम

प्रसिद्ध गायिकेचा मृत्यू

प्रसिद्ध संबलपुरी गायिका रुक्साना बानो यांचे काल रात्री एम्स भुवनेश्वर येथे उपचारादरम्यान निधन झाले. रुक्साना फक्त 27 वर्षांची होती. गेल्या काही दिवसांपासून भुवनेश्वरच्या एम्समध्ये रुक्सानाची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. रुक्सानाच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबियांनी मात्र वेगळाच दावा केला आहे.
रुक्सानावर विषप्रयोग झाल्याचे तिच्या कुटुंबाचे म्हणणे आहे.

त्यांच्या म्हणण्यानुसार, रुक्सानाला दुसऱ्या संबलपुरी गायिकेने स्लो पॉयझन देऊन हळूहळू संपवले आहे. रुक्साना 15 दिवसांपूर्वी बोलंगीरमध्ये शूटिंगदरम्यान ज्यूस पिऊन आजारी पडली होती. 27 ऑगस्ट रोजी तिला भवानीपटना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारा दरम्यान, रुखसाना हिचे निधन झाले. मात्र, रुक्सानाच्या कुटुंबियांनी केलेल्या या दाव्याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Related Articles

Back to top button