राजकीय

महाविकास आघाडी की महायुती?

  • विधानसभा निवडणुकीची धुमश्चक्री सुरु असून जवळपास आठ हजार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यात काही उमेदवार आपले नामांकन अर्ज मागे घेऊ शकतात. दरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी केवळ दोनच दिवसांचा अवधी उरला आहे.
  • अशा स्थितीत राज्यात कुणाची सत्ता येणार याचीच चर्चा आहे, अशातच या विधानसभा निवडणुकीच्या अनुशंगाने ग्राउंड झिरो मेगा प्री-पोलचा सर्व्हे पुढे आला आहे. या सर्व्हेमध्ये महाविकास आघाडीचे पारडे जड असल्याचे समोर आले आहे.
  • या सर्व्हेमध्ये महाविकास आघाडीला तब्बल 157 जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. एका अर्थाने महाविकास आघाडीची सत्ताच येणार असल्याचे हा पोल सांगतो. तर सत्ताधारी महायुतीला केवळ 117 जागा मिळणार असल्याचा अंदाज या सर्व्हेमधून वर्तविण्यात आला आहे, म्हणजेच हाती आलेली सत्ता महायुती गमावणार, असे हा पोल सांगतो. 
  • महायुतीत पुन्हा एकदा सर्वांधिक जागा भाजपाला मिळण्याची शक्यता असल्याचा अंदाज आहे. भाजपाला 79 जागा मिळतील असा दावा या सर्व्हेतून करण्यात आला आहे. महायुतीमध्ये शिवसेनेचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असून त्यांना या निवडणुकीत 23 जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 14 जागा मिळतील असेही या पोलमध्ये सांगण्यात आले आहे.
  • महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेला काँग्रेस सर्वात जास्त जागा घेणारा पक्ष ठरणार आहे, या पक्षाला 68 जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला 44 आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला 41 जागा मिळण्याचा अंदाज या पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे. महाविकास आघाडीतील मित्रपक्षांनाही चार जागा मिळण्याची शक्यता हा सर्वे सांगतो.

Related Articles

Back to top button