राजकीय

ब्रेकिंग! 23 नोव्हेंबरला अ‍ॅटम बॉम्ब फुटणार

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज शिवसेनेचे उमेदवार मंगेश कुडाळकर यांच्या प्रचाराची पहिली सभा घेत प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी शिंदे यांनी मंगेश कुडाळकर हे शंभर टक्के निवडून येतील असा दावा केला.
  • तसेच येत्या 23 नोव्हेंबरला अ‍ॅटम बॉम्ब फुटणार, असे भाकीतही शिंदेंनी केले. शिंदे म्हणाले की, मुंबईतील ही पहिलीच प्रचार सभा आहे. हा मान कुर्ला विधानसभा मतदारसंघाला मिळाला आहे. मंगेश कुडाळकर हे ओपनिंग्स बॅट्समन आहेत. आता तुम्हाला या मॅचमध्ये चौकार आणि षटकार मारायचा आहे. मारणार ना ? बाकी सगळ्यांना क्लिन बोल्ड, डिपॉझिट गुल करायचे आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे आचारसंहितेत अडकू नयेत, यासाठी नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबरमध्ये देण्यात आले. डिसेंबरचे पैसे नोव्हेंबरमध्येच येतील. कारण आपला हेतू चांगला आहे. कारण आम्ही देणारे आहोत, घेणारे नाहीत. आता तुम्हाला फक्त वर्षाला भाऊबीज मिळणार नाही, तर दर महिन्याला भाऊबीज मिळेल. आपल्याला दर महिन्याचा माहेरचा आहेर मिळणार, लाडक्या बहिणींना लखपती होताना पहायचे आहे, असेही शिंदे म्हणाले.
  • आता विरोधक बोलतात, आमचे सरकार आल्यानंतर लाडकी बहीण योजना आणि इतर योजना बंद करणार. आमच्यावर चौकशी लावण्याची, जेलमध्ये टाकण्याची भाषा करतात. तुमच्या लाडक्या भावाला जेलमध्ये टाकलेले चालेल का, असा सवाल शिंदे यांनी जनतेला केला.

Related Articles

Back to top button