मोठी बातमी! प्रसिद्ध अभिनेत्री ईडीच्या कचाट्यात

ईडीने प्रसिद्ध अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांना पुन्हा एकदा समन्स बजावले आहे. ईडीने आज कोलकाता कार्यालयात नुसरत यांची सखोल चौकशी केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, नुसरत यांच्यावर कोलकाता शहरातील न्यू टाऊनमध्ये फ्लॅटचे आश्वासन देऊन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. यापूर्वी नुसरत याच प्रकरणात 5 सप्टेंबर रोजी ईडीसमोर हजर झाल्या होत्या.
दरम्यान, 2014-15 मध्ये एका कंपनीत चारशेहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी पैसे जमा केले होते. या दरम्यान प्रत्येक व्यक्तीकडून 5.5 लाख रुपये घेण्यात आले आणि त्या बदल्यात त्यांना एक हजार स्क्वेअर फूट फ्लॅट देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, तसे झाले नाही आणि ना फ्लॅट कोणाला मिळाला, ना कोणाला पैसे परत मिळाले.
दरम्यान, सदर कंपनीत घोटाळा झाला, त्या काळात नुसरत या कंपनीच्या संचालक होत्या. याप्रकरणी भाजप नेते शंकुदेव यांनी ईडीकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर ईडीने कारवाई सुरु केली आहे.