क्राईम

पतीला रुग्णालयात नेले, फोनवर बोलताना कोसळली अन्…

जिल्हा परिषदेत जिल्हा कार्यक्रम अधिकारी देवेंद्र राऊत यांच्या पत्नी तथा जिल्हा महिला बालकल्याण विभागात अधिकारी असलेल्या मयुरी करपे-राऊत यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना काल दुपारी घडली. या घटनेची माहिती वार्‍यासारखी पसरल्याने नातेवाईकांसह अधिकारी वर्गाने जिल्हा रुग्णालयात धाव घेतली होती.
मयुरी देवेंद्र राऊत-करपे (वय 32, रा. घुलेवाडी, ता.संगमनेर, जि.नगर, ह.मु.जळगाव) असे मयत महिला अधिकार्‍यांचे नाव आहे. मयुरी व पती देवेंद्र राऊत हे 2 मुलींसह राहत होत्या. देवेंद्र हे जळगाव जिल्हा परिषदेत महिला व बालकल्याण विभागात जिल्हा कार्यक्रम अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तर मयुरी या जळगाव जिल्हा महिला बालकल्याण विभागात अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. काल दुपारी मयुरी यांनी पती देवेंद्र यांना बीपीचा त्रास होत असल्याने जळगावातील एका खाजगी रुग्णालयात दाखविण्यासाठी आणले होते. त्यावेळी अचानक मयुरी यांची प्रकृती बिघडली. त्यांना भोवळ येऊन खुर्चीवरुन खाली पडल्याने त्या जागीच कोसळल्या.
त्यानंतर नातेवाईकांनी दोघे पती-पत्नीला दुसर्‍या खाजगी रुग्णालयात तातडीने हलविले. त्याठिकाणी देवेंद्र यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर मयुरी यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. 

Related Articles

Back to top button