महाराष्ट्र
ब्रेकिंग! स्वारगेट अत्याचार प्रकरणाचा लवकरच पर्दाफाश

-
पुण्यात स्वारगेट बसस्थानकावर तरूणीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याला पोलिसांनी आज मध्यरात्री अटक केली. त्याला दुपारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीसांनी यावर भाष्य केले. स्वारगेट प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला अटक करण्यात आली आहे. याबाबत ते म्हणाले की, आरोपीला अटक झालेली आहे. तो लपून बसला होता. पोलिसांनी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून त्याला शोधून काढले आहे. या संपूर्ण घटनेचा लवकरच पर्दाफाश होईल. त्यासंदर्भात पोलीस आयुक्तांनी काही माहिती दिली आहे. काही माहिती आता जाहीरपणे सांगणे योग्य नाही. योग्य स्तरावर तपास पोहोचला की, सगळी माहिती दिली जाईल. नेमका घटनाक्रम काय आहे, तो कसा घडला, याबाबत वेळ आल्यावर आपल्याला सगळी माहिती मिळेल, असे फडणवीसांनी सांगितले.