महाराष्ट्र

बाईsss.. लाडकी बहीण योजनेत चक्क 12 पुरुषांचे अर्ज

  • राज्य सरकारने महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली. या योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेला दर महिन्याला दीड हजार रुपयांची मदत सरकारकडून दिली जात आहे. मागील काही आठवड्यांमध्ये तीन वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये या योजनेअंतर्गत दोन हफ्ते म्हणजेच प्रत्येक महिलेला तीन हजार रुपये देण्यात आले आहेत. पण या योजनेचा लाभ चक्क काही पुरुष घेत असल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये उडकीस आला आहे.
    छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड तालुक्यात 12 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज भरले. त्यांनी आधारकार्डवर स्वत:च्या फोटोऐवजी महिलांचे फोटो लावून अर्ज केल्याचा केले . मात्र या योजनेअंतर्गत दाखल करण्यात आलेल्या अर्जांच्या पडताळणीचे काम सुरु असताना हा प्रकार उघडकीस आला. बालकल्याण विभागाकडून अर्ज पडताळणी केली जाते. ऑगस्टच्या पडताळणीत हा प्रकार बालकल्याण विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या समजला. यानंतर एकच खळबळ माजली.
    कन्नडमधील 12 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारने दिलेल्या पोर्टलवर स्वत:च्या आधारकार्डाचा फोटो अपलोड केला. तसंच त्यांनी हमीपत्रामध्येही स्वत:चे नाव लिहिले. मात्र फोटो अपलोड करताना त्यांनी महिलांचा फोटो वापरला. आपली चोरी पकडली जाणार नाही, कारण सविस्तर तपशील तपासला जाणार नाही, असा त्यांना विश्वास होता. पण पडताळणी दरम्यान 12 जणांचे बिंग फुटले. आता या प्रकरणी चौकशीचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत.

Related Articles

Back to top button