हवामान
सोलापुरातील तापमान 12 अंशावरून थेट 21 अंशावर; थंडी झाली गायब

सोलापूर शहरांमध्ये काही दिवस थंडी जाणवत होती. इतकेच नव्हे तर शहर जिल्ह्यातील रात्रीचा बारा अंश पर्यंत उतरला होता. यामुळे नागरिकांना गुलाबी थंडीचा अनुभव आला. मात्र आता ऐन हिवाळ्यात उन्हाळ्याची फिलिंग नागरिकांना येत आहे.
कारण शहर व परिसरातील तापमान आता वाढत आहे. उन्हाळा चालू आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 12 अंश पर्यंत असलेले रात्रीचे तापमान आता थेट 21 अंशापर्यंत पोहोचले आहे. दरम्यान राज्यात अचानक थंडीचा जोर ओसरल्याचे दिसत आहे. बहुतांश जिल्ह्यात थंडीचा पारा घसरला असून, काहीसा उकाडा जाणवत आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत थंडीचा जोर कमी राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.