क्राईम

ट्विस्ट! खोक्या भाईला बिश्नोई गँगची थेट धमकी

  • बीडमधील सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचे एकापाठोपाठ एक कारनामे पुढे येत आहे. बॅटने अमानुष मारहाण तसेच शिकारीत आडवे येणाऱ्या ढाकणे पिता-पुत्रांना मारहाण केल्याच्या प्रकरणात फरार असलेला भोसले उर्फ खोक्याभाई तिसऱ्या दिवशीही पोलिसांना सापडलेला नाही.
  • वन विभागाने आज त्याच्या घराची झाडाझडती घेतली. त्यात अधिकाऱ्यांना हरणांसारख्या वन्य प्राण्यांना पकडण्यासाठी लागणारे सापळे व इतर सामग्री हाती लागली. यामुळे त्याच्यावर हरणाची शिकार करून मांस खाण्याचे आरोप केले जात आहेत.
  • दरम्यान या प्रकरणात आता मोठी बातमी समोर आली आहे. खोक्याला लॉरेन्स बिश्नोईच्या नावाचा वापर करून धमकी देण्यात आली आहे. लॉरेन्स बिश्नोईच्या नावाचा वापर करून भोसले याला धमकी देण्यात आली आहे. बिश्नोईच्या नावाने अज्ञात व्यक्तीकडून दोन दिवसांपूर्वी एक फेसबुक अकाउंट तयार करण्यात आले. या फेसबुक अकाउंटवरून खोक्या याला धमकी देण्यात आली आहे.
  • खोक्याला लवकरात लवकर जेलमध्ये टाका, अशी मागणी या अकाउंटवरून करण्यात आली आहे. हरिण आमचे दैवत आहे, त्यामुळे खोक्या माफीच्या लायकीचा नाही, असे या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे खोक्या भाई आता लॉरेन्स बिश्नोईच्या निशाण्यावर असल्याचे दिसत आहे.

Related Articles

Back to top button