क्राईम

ब्रेकिंग! प्रेयसीचा गळा आवळून खून

अलीकडे महिला अत्याचारांचे प्रमाण वाढले आहे. राज्यात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचारांमध्येही वाढ झाली आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवडमध्ये प्रेयसीचा गळा आवळून मृतदेह तरुणीच्या आईच्या घरासमोर रिक्षात ठेवून प्रियकर फरार झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ही घटना काल रात्री बारा ते पहाटे तीनच्या दरम्यान काळेवाडी स्मशानभूमी जवळ घडली असून आज सकाळी ती उघडकीस आली आहे.
शिवानी सोमनाथ सुपेकर (वय 27, रा. जगताप नगर, थेरगाव) असे गळा आवळून हत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. प्रियकर विनायक आवळे याने शिवानीची हत्या करून रिक्षात मृतदेह टाकून आईच्या घरासमोर लावून फरार झाला आहे. वाकड पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवानी गेल्या एक- दोन वर्षांपासून विनायक याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. काल रात्री दोघांमध्ये किरकोळ वाद झाले होते. याच रागातून विनायकने शिवानीचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर मृतदेह रिक्षात ठेवून तिच्या आईच्या घरासमोर रिक्षा लावून आरोपी तेथून पसार झाला आहे.

Related Articles

Back to top button